लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा वसाहतीमध्ये घर विक्री मधील दलाल आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका नोकरदार महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.

सपना श्रीकांत शिंदे (४४, रा. अरबानो, लोढा पलावा, डोंबिवली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या नोकरदार आहेत. मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत. मारहाणीत तक्रारदार महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तक्रारदार सपना शिंदे आणि आरोपी मोहम्मद हमजा हे पलावामधील एकाच सोसायटीत राहतात. मोहम्मद हे घर विक्रीमधील दलाल आहेत. हे सपना यांना माहिती होते.

हेही वाचा… भाजपा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे डॉ. श्रीकांत शिंदे दोनदा खासदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून सपना यांना एक घर विक्री दलाल तुम्हाला तुमचे घर विक्री करायचे आहे का, अशी सतत मोबाईलवर विचारणा करत होता. आपले घर विकायचे नाही तरी आपणास अनोळखी घर विक्री दलाल का संपर्क करतोय, असा प्रश्न सपना यांना पडला होता.

हेही वाचा… “जेव्हा बोट बुडेल तेव्हा पळणारा पहिला उंदीर…”, राजन विचारेंची खोचक टीका, नेमका रोख कुणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटीतील मोहम्मद घर विक्री दलाल आहेत. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक कोणाला दिला आहे का, याची विचारणा करण्यासाठी सपना शिंदे गेल्या रविवारी मोहम्मद यांच्या घरी गेल्या. त्यावेळी मोहम्मद यांनी ‘तुम्ही माझ्या घरी कशासाठी आल्या आहात’. असे बोलून मोहम्मद आणि त्याच्या दोन साथीदारांनी सपना यांना घरात बेदम मारहाण केली. आरोपींनी कानावर ठोशे बुक्के लगावल्याने सपना यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. पायाचे बोट तुटले आहे. त्यांच्या कानातील सोन्याची रिंग हरवली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय सहारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.