कल्याण- गणपती विसर्जनासाठी नागरिकांना गणेशघाट खाडी, नदी, कृत्रिम तलावांच्या ठिकाणी जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने नागरिकांना पालिका साहाय्यक आयुक्तांना मोबाईल वरुन संपर्क करा आणि घराच्या दारात, सोसायटीच्या प्रवेशव्दारात येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात गणपती मूर्ती विसर्जनासाठी द्या, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे शहरातील तापमानाचा पारा वाढला…. ; वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अगांची काहीली

रस्त्यावरील, गणेशघाट भागातील गर्दी कमी राहावी. नागरिकांना गर्दी, वाहन कोंडी असा कोणताही त्रास विसर्जन दिवशी होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने विसर्जनासाठी पालिका साहाय्यक आयुक्तांना संपर्क करा, असा उपक्रम सुरू केला आहे. विसर्जन आपल्या दारी या पालिकेने यापूर्वी राबविलेल्या उपक्रमाचा हा एक भाग आहे, असे अधिकारी म्हणाला.

हेही वाचा >>> डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसावर लाच मागितल्याचा गुन्हा ; पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे मागितली होती लाच

गणेश भक्तांनी पालिका साहाय्यक आयुक्तांना गणपती विसर्जनासाठी संपर्क केला की त्या प्रभागातील कर्मचारी संपर्क केलेल्या गणेश भक्ताच्या घरी जातील. तेथे ते आरती व इतर धार्मिक कार्यक्रम उरकले की पालिका कर्मचारी संबंधित गणेश भक्ताच्या दारातून किंवा सोसायटी प्रवेशव्दारातून गणेश मूर्ती विसर्जनासाठी ताब्यात घेतील. निर्माल्य घरातून ताब्यात घेतील. ही मूर्ती प्रभागातील एक ट्रकमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या जलकुंभात विसर्जित केली जाईल. या उपक्रमामुळे एकावेळी अनेक भाविका रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होईल. रस्त्यावरच्या नियमित वाहतुकीला कसलाही अडथळा येणार नाही. भाविकांना आपल्या घराच्या दारात विसर्जन झाल्याचे समाधान मिळेल. हाही या उपक्रमाचा उद्देश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षापर्यंत नागरिकांना गणपती पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलाव किंवा विसर्जन जलकुंभापर्यंत घेऊन जावे लागत होते. चालू वर्षापासून पालिकेने मागणी करणाऱ्या गणेश भक्तांच्या घरातून मूर्ती ताब्यात घेऊन विसर्जन करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमाला नागरिक प्रतिसाद देत आहेत, असे अधिकारी म्हणाला.

या उपक्रमातील अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ प्रभाग (टिटवाळा, मोहने परिसर) साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते ९८१९४११४९१
ब प्रभाग (बिर्ला महाविद्यालय परिसर) साहाय्यक आयुक्त राजेश सावंत ९८१९५०४३०४
क प्रभाग (बैलबाजार, पारनाका परिसर) साहाय्यक आयुक्त संजय कुमावत ९३२२९६६६६९
जे प्रभाग (लोकग्राम परिसर) साहाय्यक आयुक्त सविता हिले ९९८७६३५९९१
ड प्रभाग (कोळसेवाडी परिसर) साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर ९८९२८७५०१०
फ प्रभाग (टिळकनगर परिसर) साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे ८७७९४८३९६६
ह प्रभाग (गरीबाचापाडा) साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे ७०२१३१०५३७
ग प्रभाग (आयरे परिसर) साहाय्यक आयुक्त संजय साबळे ९८२०००७५६६
आय प्रभाग (खडेगोळवली परिसर) किशोर ठाकुर ९८२२७७६०८५
ई प्रभाग (२७ गाव) भारत पवार ८३५६८८८३००