scorecardresearch

पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बायपासवर सकाळी वाहनांच्या रांगा

खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीच्या कामांमुळे मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूकीवर परिणाम

पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बायपासवर सकाळी वाहनांच्या रांगा
पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बायपासवर सकाळी वाहनांच्या रांगा (संग्रहीत छायाचित्र)

ठाणे : गुरूवारी सकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूल ते माजीवडा आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर टेम्पो बंद पडल्याने तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीमुळे मुंब्रा बायपास मार्गावर वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे प्रंचड हाल झाले.

पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाणे, भिवंडी, कल्याण येथून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. या मार्गिकेवर सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कोपरी रेल्वे पूलावर एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी कामानिमित्ताने मुंबईत निघालेल्या वाहन चालकांचे यामुळे हाल झाले.

तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीच्या कामांमुळे मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खारेगाव टोलनाका ते मुंब्रा बायपास मार्ग, वाय जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या