कल्याण- येथील पूर्व भागातील नांदिवली तर्फ गावा जवळील कशिश हाॅटेलच्या मालकावर दोन इसमांनी धारदार तलवारींनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. रविवारी मध्यरात्री मलंग गड रस्त्यावरील काकाचा ढाबा भागात ही घटना घडली.

भीम रामेश्वर सिंग (३६, रा. आमराई, विजयनगर, कल्याण) या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भीम सिंग हे रविवारी मध्यरात्री हाॅटेल बंद करुन नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन कल्याण पूर्वेतील घरी एकटेच चालले होते. मलंगगड रस्त्यावरील काकाच्या ढाब्या जवळ आले असता तेथून रस्त्याने दोन जण हातात धारदार तलवारी घेऊन चालले होते.

हेही वाचा >>>धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया अटक; प्रशांत काॅर्नर कारवाई प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भीम यांची दुचाकी पाहताच दोन्ही आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांची स्कुटर अडवून जवळील हत्याराने भीम यांच्या डोक्यावर धारदार तलवारीने वार केले. दोन्ही आरोपींच्या तावडीतून सुटून भीम यांनी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी स्कुटरसह घटनास्थळावरुन पळ काढला. स्कुटरच्या कप्प्यात ग्राहक मिळकतीची एक लाखाची रक्कम होती. भीम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.