डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकाजवळील सहकारनगर झोपडपट्टीत शनिवारी मध्यरात्री चोरी करत असलेल्या एका चोरटयाला परिसरातील रहिवाशांनी चित्रपटातील थराराप्रमाणे पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा चोरटा मुंबईतील गोरेगावमध्ये भागवत सिंगनगरमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

खलीद सतार हसमी (३८) असे चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी कोपर रेल्वे स्थानकाजवळील सहकारनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सुनीलकुमार निसार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

pune shaniwar peth loksatta news
पुणे : शनिवार पेठेत घरफोडी सात लाखांचा ऐवज लंपास
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरास ऐवजासह अटक
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
house burglary loksatta news
पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज चोरीला
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
Two wheeler theft on the rise in pune city
शहरबात : दुचाकी चोर, पोलिसांना शिरजोर!

हेही वाचा : कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त

पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीतील माहिती अशी की, तक्रारदार सुनीलकुमार आणि निखील सिंग हे दोघे सहकारनगर मधील एका घरात वास्तव्य करतात. निखील एका कंपनीत काम करतात. सहकानगर भागातील रहिवासी रात्र झाल्याने झोपी गेले होते. निखील सिंग शनिवारी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत घरात लॅपटाॅपवर काम करत बसले होते. काम करत असताना घराच्या बाहेर खटखट असा आवाज येत होता.

निखील सिंग यांनी सहकारी सुनीलकुमार यांना झोपेतून उठवले. त्यांना घराच्या बाहेर कोणीतरी ठोकत असल्याचे सांगितले. सिंग, निसार दोघेही घराबाहेर निघाले. त्यावेळी त्यांना हाजीफाबी पठाण यांच्या घराचे कुलुप चोरटा तोडत असल्याचे दिसले. सिंग, निसार यांना पाहताच चोरटा आयरेगाव दिशेने पळू लागला. निसार, सिंग यांनी चोर चोर ओरडा करत परिसरातील रहिवाशांनी उठवले. सर्व रहिवासी चोरट्याच्या मागे धावत सुटले. त्याला चारही बाजुने घेराव घालुन नागरिकांनी पकडले. त्याच्या डोक्याला अगोदरच जखम झाली होती. नागरिकांनी रामनगर पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. चोरट्याने आपले नाव खलीद हसमी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात सुनीलकुमार निसार यांच्या तक्रारीवरून गु्न्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा

मुंबईतील गोरेगाव येथून येऊन चोरटा चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने यापूर्वी अशा किती चोऱ्या केल्या आहेत. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नागरिकांच्या धाडसाचे पोलिसांनी कौतुक केले.

Story img Loader