ठाणे : गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी तसेच वातानुकूलीत प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी अतिरिक्त पैसे खर्च करून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे (एसी लोकल) मासिक पास काढले आहेत. परंतु रेल्वेगाड्यांची तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी सुट्ट्या, रविवारी आणि काही ठराविक दिवसात रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत रद्द करून त्याऐवजी साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत. त्यात हा नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा अशा विविध भागातून नागरिक उपनगरीय रेल्वेगाड्यांनी मुंबईत कामानिमित्ताने जात असतात. प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये देखील गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांना गारेगार प्रवास अनुभवता यावा यासाठी २०२२ पासून काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत केल्या आहेत. सुरूवातीला या रेल्वेगाड्यांच्या मासिक पास आणि दैनंदिन तिकीट महागडे असल्याने नागरिकांनी त्यास पसंती दिली नव्हती. परंतु गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी आता नोकरदार, लघु उद्योजक मोठ्या संख्येने वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

हेही वाचा : डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत

परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्यांची वाहतुक रविवारी, शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी तसेच काही ठराविक दिवसांत रद्द करून त्यावेळेत साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजून देखील गर्दीचाच प्रवास करावा लागत आहे. या विषयी प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. काही प्रवासी शारिरिक आजारपणाचा त्रास होणारे प्रवासी देखील सुरक्षित प्रवासासाठी वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या रद्द झाल्यास नाइलाजाने नियमित रेल्वेगाड्यांत गर्दीत प्रवास करावा लागत आहे. या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या देखील कमी आहेत. त्यामुळे एखादी रेल्वेगाडी वेळेत आली नाही. तर स्थानकात प्रवाशांना रेल्वेगाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे.

हेही वाचा : ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

“आम्ही अतिरिक्त पैसे मोजून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे मासिक पास काढले आहेत. परंतु या रेल्वेगाड्या अनेकदा १५ ते २० मिनीटे उशीराने धावतात. तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील सेवा रद्द करून त्याऐवजी साध्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अनेक कार्यालये सुरू असतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असा प्रश्न पडतो आहे.” – एकनाथ सोनवणे, प्रवासी.

वातानुकूलीत आणि साध्या रेल्वेगाड्यांतील प्रथम दर्जाच्या डब्यांचे मासिक दर (रुपयांत)

ठाणे ते सीएसएमटी – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते ठाणे – प्रथम दर्जा – ६६०, वातानुकूलीत -१ हजार ३३५
बदलापूर ते ठाणे – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते सीएसएमटी – प्रथम दर्जा- १ हजार १०५, वातानुकूलीत – २ हजार १३५
बदलापूर ते सीएसएमटी- प्रथम दर्जा- १ हजार २८०, वातानुकूलीत – २ हजार ३८५