ठाणे : भिवंडी बायपास भागात असलेल्या लैला ऑर्क्रेस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट या बारवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी तीन बारबाला, हाॅटेलचे व्यवस्थापक, ग्राहक यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तोकडे कपडे परिधान करुन बारबाला अश्लील हावभाव करत होते. कोनगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ११९, ११७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी बायपास येथील रांजनोली परिसरात लैला ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट आहेत. रात्री उशीरापर्यंत हा ऑक्रेस्ट्रा बार सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शुक्रवारी रात्री कल्याण युनीटचे पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी बारच्या तळमजल्यावर काही महिला तोकडे कपडे परिधान करुन ग्राहकांसमोर बसल्या होत्या. तर बारच्या पहिल्या मजल्यावर देखील अशाच प्रकारे ऑर्क्रेस्ट्रा सुरु असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन व्यवस्थापक, १६ महिला गायक, तीन बारबाला, चार पुरुष वेटर, पाच ग्राहक अशा सर्वांची चौकशी सुरु केली. पोलिसांनी याप्रकरणात १५ हजार १४० रुपयांची रोकड देखील जप्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी ग्राहकांची विचारणा केली असता, यातील दोन ग्राहक चेन्नई, दोन भिवंडी आणि एक उल्हासनगर येथील असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बारबाला, व्यवस्थापक आणि ग्राहकांचा सामावेश आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ११९, ११७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.