ठाणे: राज्यासह ठाणे जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून करोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे वर्धक मात्रा घेलेली नाही असे असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ ११ टक्केच नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. अद्यापही ५३ लाख ४७ हजार २३३ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

करोना प्रादूर्भाव ओसरु लागल्यामुळे २०२२ मध्ये सर्व निर्बंध शिथील करण्यात आली होती. करोनाचे रुग्ण आढळून येत नसल्याने नागरिकांच्या मनातील करोना बाबतची भिती देखील कमी झाली होती. करोना लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने वर्धक मात्रा दिली जात होती. परंतू, वर्धक मात्रा देण्याच्या दरम्यान करोनाचा प्रादूर्भाव ओसरु लागला होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा… ठाणे : भिवंडीत ८०० किलो प्लास्टिक जप्त, महापालिकेची कारवाई

गेले काही दिवसांपासून राज्यात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात, ठाणे जिल्ह्याचा ही समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. करोना रुग्ण आढळून येत असल्याचे कळताच, जिल्हा आरोग्य विभाग सर्तक झाले आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. दिवसाला जिल्ह्यात १ ते २ हजार करोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये जे रुग्ण करोना बाधीत असल्याचे आढळून येत आहेत त्यापैकी बहुसंख्य रुग्णांनी वर्धक मात्रा घेतली नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सुत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यात ११ टक्के म्हणजेच ८ लाख ६१ हजार ३३ रुग्णांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे. जिल्ह्यात ६२ लाख ८ हजार २६६ नागरिकांनी करोना लशीची दुसरी मात्रा घेतलेली आहे. यापैकी ५३ लाख ४७ हजार २३३ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाचे रुग्ण आढळून येण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. हे प्रमाण कमी असले तरी, खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. करोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच करोना ओसरल्यानंतर अनेक नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली नव्हती. ज्या नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, त्यांनी वर्धक मात्रा घेतली पाहिजे. – डॅा. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

करोना लसीकरण घेतलेल्या नागरिकांची आकडेवारी

लसीचा प्रकारपहिली मात्रादुसरी मात्रावर्धक मात्रा
कोव्हिशिल्ड६०४४२९१५४६९४२९७८६२२४
कोव्हॅक्सिन८४५०११७३८८३७७४८०९