ठाणे : इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ४० लाख रुपयांच्या बदल्यात १ कोटी ६० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेण्यासाठी तो मुरबाड येथे गेला होता. त्यावेळी त्याला एका टोळीने लुटले. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र याला विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकणी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण

डोंबिवली येथील मानपाडा भागात सुरेंद्र पाटील राहतो. त्याचे इंस्टाग्राम या समजमध्यामावर दीड लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला एका व्यक्तीने संपर्क साधला. आपण बनावट नोटा छापतो असे त्यांनी सांगितले. त्यांनतर दोघांमध्ये ४० लाख रुपयांच्या बदल्यात दीड कोटी बनावट नोटा देण्याचे ठरले. रविवारी सुरेंद्र त्याची मर्सडिज कार घेऊन मुरबाड येथे गेला असता. सुरक्षेसाठी त्याने परवाना नसलेल्या दोन बंदुका ठेवल्या होत्या. दरम्यान आठ जण त्याठिकाणी आले. त्यांनी सुरेंद्र याच्याकडील ४० लाख घेतले आणि पळून गेले. त्यांनतर सुरेंद्र याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाने सुरू केला.

हेही वाचा : आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ; रस्ते, स्वच्छता, आरोग्य, फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, हवालदार संजय राठोड, शिपाई अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, मयुरी भोसले, पोलीस नाईक हिवरे यांच्या पथकाने स्वप्निल जाधव, आदेश भोईर, सचिन जाधव आणि अक्षय गायकवाड या चौघांना अटक केली. तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १४ लाख ३५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी सुरेंद्र पाटील यालाही अटक केली आहे. त्याने विनापरवाना शस्त्र वापरले होते अशी उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

हेही वाचा : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे सुरेंद्र पाटील

सुरेंद्र पाटील हा व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक आहे. सुरेंद्र याने डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात कोणीही नसताना त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून स्वत:चे छायाचित्रण करून ते इन्स्टाग्रामवर प्रसारित केले होते. त्यानंतर सुरेंद्र पाटील चर्चेत आला होता. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. सुरेंद्र याच्यावर फसवणूक, मारहाण करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याचे १ लाख ५७ हजारहून अधिक फाॅलोवर्स आहेत. त्यावर त्याने डोंबिवलीचा किंग असा उल्लेख केला आहे. त्याच्या चित्रीकरणामध्येही तो स्वत:ला दादा म्हणवून घेतो.