कल्याण : भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना तिकीट तपासणीसाने एका प्रवाशाला प्रवासाचे तिकीट विचारले. त्यांच्याजवळ तिकीट नव्हते. तपासणीसाने त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. अंबरनाथ रेल्वे स्थानक आल्यानंतर या तरूणाला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या ताब्यात दिले. जवानांना या प्रवाशाचा संशय आला. त्यांनी त्याची झडती घेतली असता या प्रवाशाजवळ तीन किलो गांजा आढळून आला.

एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने एक्सप्रेसमधून अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत होता. या तरूणाचे धाडस पाहून जवान चक्रावून गेले. कल्याण रेल्वे स्थानकात या प्रवाशाला अंमली पदार्थासह उतरविण्यात आले. तेथे त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांची सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हा तरूण उच्चशिक्षित कुटुंबातील एक उच्चशिक्षित सदस्य असल्याचे आढळले.

हेही वाचा…‘वाचलेली पुस्तके आणा आणि तेवढीच आवडीची पुस्तके घेऊन जा, डोंबिवलीत पुस्तक अदान प्रदान उपक्रमात एक लाखाचे लक्ष्य

हा प्रवासी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. रेल्वे तिकीट तपासणीसाच्या तत्परतेमुळे हा प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रवाशाची पोलिसांनी त्यांनी गांजा कोठुन आणला. हा गांजा ते कोणाला विक्री करणार होते, या दिशेने तपास करणार आहेत. रायगड ते भुवनेश्वर एक्सप्रेस असा खिशात पैसे नसताना त्यांंनी हा प्रवास कसा केला याचीही माहिती पोलीस काढत आहेत. या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा…ठाण्यात पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, एकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीत मृत्यू

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे रेल्वे मार्गालगत एका तरूण बेवारस स्थितीत मरून पडला होता. देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी ही माहिती समाज माध्यमांवर प्रसारित केली. या माहितीवरून पोलीस पाटील भोईर यांना मृताची ओळख पटवून देण्यास एक व्यक्तिने साहाय्यक केले. भोईर यांनी ही माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी मयत हा अंमली पदार्थ व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो आमच्या संपर्कात नव्हता असे लोहमार्ग पोलिसांना सांगितले. देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर खाडी किनारा भागात काही ठराविक इसम एमडी पावडर, गांजाची लपूनछपून अधिक प्रमाणात तस्करी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या व्यक्ति लपूनछपून व्यवहार करत असल्याने त्या पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याचे समजते. पोलीस उपायुक्तांनी आपले अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई पथक विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत तैनात ठेवण्याची मागणी डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांकडून केली जात आहे.