लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पूर्व भागातील पाथर्ली नाका येथे गुरुवारी रात्री चार जणांनी एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून धारदार चाकुने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. पाथर्ली नाक्यावरील पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांजवळ हा प्रकार घडला आहे.

या हल्ल्यात सुमीत राहुल गायकवाड (२१, रा. सिताराम गायकवाड इमारत, पाथर्ली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री हा मारहाणीचा प्रकार घडला. विनोद कांबळे, सोहम धुरुदेव, कविता धुरूदेव, शुभम धुरुदेव अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा… ठाकुर्ली रेल्वे रुळा जवळील प्रवाशांना घातक ठरणारा दिशादर्शक हटविला

पोलिसांनी सांगितले, गुरुवारी मध्यरात्री तक्रारदार सुमीत गायकवाड हा आपला मित्र दक्ष याच्या सोबतीने दुचाकीवरुन चालला होता. पाथर्ली नाका झोपडपट्टी पुनर्वसन घरांजवळ ते आले. तेथे ते थांबले असताना त्यांच्या जवळ आरोपी विनोद आणि त्याचे तीन साथीदार आले. त्यांनी सुमीत यांना जुन्या भांडणाविषयी प्रश्न उपस्थित करुन वाद उकरुन काढला.

हेही वाचा… ठाणे : मानपाडा चौकातील टायटन रुग्णालयाजवळ भीषण आग, आगीमुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारही आरोपींनी सुमीतला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला खाली पाडले. शुभमने धारदार चाकुने सुमितवर चाकू हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. टिळकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुमितने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे.