ठाणे : महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता. त्यानंतर गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – वाढदिवसानिमित्त कार्यक्रम न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

हेही वाचा – आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, व्दारलीतील महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. डाॅक्टरांकडून योग्य ते उपचार केले जात आहे. तसेच याप्रकरणात पोलीस त्यांचे काम करतील. पोलीस किंवा कायद्याच्या कामात सरकार अथवा त्यातील कोणताही मंत्री कसलाही हस्तक्षेप करत नाहीत. असे सांगत देसाई यांनी याप्रकरणावर अधिक बोलणे टाळले.