भागभांडवली बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे अमिष दाखवून ३७ गुंतवणूकदारांची अडीच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तुषार साळुंखे (३५) याला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज भागात राहणाऱ्या तुषार आणि त्याच्या काही साथीदारांनी सुन्तान इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च नावाची एक कंपनी थाटली होती. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी कंपनी मार्फत काही योजना तयार केल्या होत्या. यामध्ये भाग भांडवलमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना तीन टक्के परतावा मिळेल अशा योजनेचाही सामावेश होता. त्यामुळे मुंबई, ठाण्यात राहणाऱ्या अनेक उच्चशिक्षित नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली होती.

सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला होता. परंतु २०१९ नंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले होते. गुंतवणूकदारांनी तुषारकडे परताव्यासाठी तगादा लावण्यास सुरू केली. मात्र, तुषारकडून यासंदर्भात ठोस उत्तर मिळत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी तुषार विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता.

चंद्रपूरमधील भारतीय स्टेट बँकेची बनावट आयकर कागदपत्रांद्वारे १४ कोटी २६ लाखांची फसवणूक!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी तुषारला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आतापर्यंत ३७ गुंतवणूकदारांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून २ कोटी ५६ लाख ४२३ रुपये इतक्या रुपयांची ही फसवणूक आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.