Pushpak Express and Local Train Accident : कल्याण फाटा येथे राहणारा शिवम गवळी हा तरुण या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवम गवळी याचा भाऊ आणि त्याचे नातेवाईक तेथे आले होते. रुग्णालयाबाहेर एका कठड्यावर बसून शिवम याचा भाऊ रडत होता. त्याचे अश्रू अनावर झाले होते.
कल्याण फाटा परिसरात शिवम गवळी राहतो. शिवम गवळी याने दिवा येथून प्रवास सुरू केला. मागील वर्षभरापासून तो मुंबईत एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरल्या नंतर तो त्याचा पुढील प्रवास सुरू करतो. शिवम देखील घटनेत जखमी झाला आहे. सुरवातीला त्याला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याचा भाऊ आणि त्याचे इतर नातेवाईक कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाले. त्याचा भाऊ एका कठड्यावर बसला होता, त्याला त्याचे नातेवाईक समजावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याचे अश्रू अनावर झाले होते. शिवमला खाजगी रुग्णालयात नेताना त्याचे त्याचे सर्व नातेवाईक रडत होते. शिवम वर्षभरापासून खासगी कंपनीत कामाला आहे, असे त्यांनी सांगितले.