scorecardresearch

Premium

मराठी माणूस सहन करतोय म्हणून अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते ; जितेंद्र आव्हाड यांची तृप्ती देवरुखकर प्रकरणावर प्रतिक्रिया

मराठी भगिनीवरील अन्याय सहन करणार नसून आपण तिच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

ncp leader jitendra awhad reaction on ripti devrukhkar issue
तृप्ती देवरुखकर व जितेंद्र आव्हाड (संग्रहित छायाचित्र)

ठाणे – मला वाटते हे आजचे प्रकरण नाही. मराठी माणूस सहन करतो. त्यामुळेच अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते. आपण पहिल्यापासून कणखर हिमंत घ्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तृप्ती देवरुखकर प्रकरणावर बोलताना व्यक्त केली. मतांच्या गणितात हा समूह दुखावेल. तो समूह नाराज होईल, असे राजकीय पक्ष म्हणत गेले अन् त्यातून मराठी माणसाची टक्केवारी कमी होत गेली, असा दावाही त्यांनी केला. भेदभावाचा हा प्रश्न मुंबई पुरता नाही तर सबंध देशाचा आहे. आज देशात जो विद्वेष पसरविला जात आहे. त्याची ही परिणीती आहे, असेही ते म्हणाले. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेस घर देण्यास नकार देत असल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या संदर्भात तृप्ती यांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> अनंत चतुर्दशीला आवाजाच्या पातळीने गाठली शंभरी; मध्यरात्री ध्वनी प्रदूषणाची पातळी सर्वाधिक

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
rape case filed against the boyfriend
प्रेम प्रकरणाची कुणकुण पोहचली घरात… अन् प्रियकराविरुद्ध गुन्हा
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

मराठी भगिनीवरील अन्याय सहन करणार नसून आपण तिच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मुंबई ही आगरी, कोळी, पाठारे-प्रभुंची आहे. मुंबई ही समुद्राने वेढलेली असल्याने मासे आणि भात हा इथला मुख्य आहार होता. हा भेदभाव कधी सुरू झाला. येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही घर देण्यास नकार देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांनी पारशी नाव धारण केले होते. आदलजी सोराबजी असे नाव त्यांनी घेतले होते. पण, ते उघडकीस आल्यानंतर त्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे हे आजचे नाही, असे आव्हाड म्हणाले. जातीधर्म, भाषा,  प्रांत यावरून घरे देण्यात येत नाहीत. हे सर्व थांबले पाहिजेच. हे प्रकार बंद करण्याची ताकद फक्त मराठी माणसामध्येच आहे.

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्राला अटक

आज चांगल्या सोसायटीत एससी, एसटी मांसाहार करणाऱ्या आणि मुस्लीम लोकांना घरे दिली जात नाहीत. असे का होत आहे? तुम्ही कुठे रहायचे, तुम्ही काय खायचे; हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. पण, हे मुंबईत घडते ना? आपण उघड्या डोळ्याने हे बघतो, आपण काहीच बोलत नाही, असेही ते म्हणाले. राजकीय पक्ष थेट भूमिका घेत नाहीत. मतांच्या गणितात हा समूह दुखावेल. तो समूह नाराज होईल, असे राजकीय पक्ष म्हणत गेले अन् त्यातून मराठी माणसाची टक्केवारी कमी होत गेली. तरीही मराठी माणसाला मुंबईत निवारा नाकारण्याची हिमंत आली कुठून, याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवाय. आज त्या वर्गाकडे आर्थिक स्रोत आहेत. म्हणून त्यांना दुखवायचे नसेल तर आपण हेही ध्यानात घेतले पाहिजे की आपणही मुस्लिम, ओबीसी, दलित यांना घरे नाकारली आहेत. प्रश्न हाच आहे की हा भेदभाव आला कुठून? असा भेदभाव असता कामा नये. पण, आपणही स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आपण कितीजणांशी भेदभाव केला आहे. हा प्रश्न मुंबई पुरता नाही तर सबंध देशाचा आहे. आज देशात जो विद्वेष पसरविला जात आहे. त्याची ही परिणीती आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader jitendra awhad reaction on ripti devrukhkar issue zws

First published on: 29-09-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×