लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : अवघ्या सहा महिन्यापूर्वीच राज्य शासनामार्फत शहरात उभारण्यात आलेल्या बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनामार्फत दैनंदिन स्वच्छता व देखभालीचे काम केले जात नसल्यामुळे हे नुकसान झाले असल्याची तक्रार केली जात आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रमुख रस्त्यावर आगळ्या-वेगळ्या आकाराचे बस थांबे आणि जेष्ठ नागरिक कट्टे उभारण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी होती. त्यामुळे या कामासाठी राज्य शासनामार्फत विशेष निधी स्वरूपात १० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्यानुसार जवळपास शंभर बस थांबे व विश्रांती कट्टे मीरा भाईंदर तसेच ठाण्यातील ओळा- माजीवाडा भागात मे २०२३ मध्ये उभारण्यात आले आहेत.

आणखी वाचा-कल्याणमध्ये सापाड गावातील रस्ता रूंदीकरणातील बांधकामे हटवली

मात्र यामधील मीरा भाईंदर मध्ये असलेल्या बस थांब्याची व कट्ट्याची अवघ्या सहा महिन्यात दुरवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने या साहित्याची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यात बसने नागरिकांना कठीण झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी वापरा विनाच हे साहित्य मोडकडीस येऊ लागले आहे. मोजक्याच ठिकाणी नागरी रहदारी सुरु असल्यामुळे हे वापरले जात आहे.

यातील बस थांबे उभारताना त्याची नियमित देखभाल व्हावी, म्हणून यातील तीन फूट जागा ही जाहिरात दारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या बस थांब्यावर कोणतीही जाहिरात केली जात नसल्याने देखभालीचा आता प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-येऊरचे बेकायदा बांधकाम पुन्हा कचाट्यात, परवानगी तपासण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे बस थांबे व विश्रांती कट्टे राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आले आहे. या संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यात सुधारणा करण्याचे सूचित केले जाईल.” -नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता