अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्यावरील कामकाजात कुचराई केल्याचा ठपका ठेवत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांच्यावर शुक्रवारी निलबंनाची कारवाई केल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद कार्यालयात उमटले असून या कारवाईच्या निषेधार्थ ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी राज्यातील अन्य कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांना आंदोलनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2015 रोजी प्रकाशित
ठाणे आरटीओ अधिकारी निलंबित
अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्यावरील कामकाजात कुचराई केल्याचा ठपका ठेवत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांच्यावर शुक्रवारी निलबंनाची कारवाई केल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद कार्यालयात उमटले
First published on: 25-04-2015 at 12:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto officer suspended