लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना सतत फोन करत होते आणि मुख्यमंत्री वाचविण्यासाठी रडत होते, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. दिल्लीप्रमाणे राज्यातही पप्पू तयार झाला आहे, असा आदित्य यांचा उल्लेख करत त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच संजय राऊत हे दुतोंडी विष्ठा खाणारे गांडूळ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे

बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’ वर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत आदित्य यांच्यावर टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी आणि कष्टकरी जनतेचे अश्रू पुसणारे आहेत. मासा मेला म्हणून घरात बसून रडणारे नाहीत. शिंदे हे रडणारे नाहीत, रडवणारे आहेत, असे म्हस्के म्हणाले.

आणखी वाचा- “एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले” आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही आमदारांनीच त्यांना…”

शिंदे यांना कशासाठी नोटीस येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी सर्व नेत्यांना बाजूला ठेवून ही बैठक घेतली होती. नोटिसा आल्या म्हणून पंतप्रधानांसमोर रडले होते, असा गौप्यस्फोट म्हस्के यांनी केला आहे. तुमच्या, तुमच्या मित्रांच्या परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत आणि कुठे कुठे गुंतवणूक केली, याबाबत आम्हाला माहिती आहे. ते उघड करायला लावू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आणखी वाचा- “बंडखोरीआधी एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते”, आदित्य ठाकरेंच्या विधानावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “भाजपाची ती…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांच्याप्रमाणेच आदित्य यांना मानसिक आजार झाला आहे. जी गोष्ट घडली नाही, ती त्यांना घडल्यासारखी वाटते. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज आहे, अशी टीकाही त्यांनी केली. उंदीर बिळात लपतात, तसे घरात कोण लपले होते, हे सर्व राज्याला माहिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संजय राऊत हे दुतोंडी विष्ठा खाणारे गांडूळ आहेत. त्यांचे एक तोंड मातोश्री कडे तर दुसरे तोंड सिल्व्हर ओककडे आहे, अशी टीका करत शांत रहा नाहीतर आमच्याकडे बोलायला खूप गोष्टी आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.