भाईंदरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या शयनगृहात गळफास लावून आत्महत्या केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उत्तनमध्ये घडली. अ‍ॅरॉन डिमेलो असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर कठीण गेल्याने त्या तणावातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उत्तन येथील नवघरमध्ये राहणारा अ‍ॅरॉन दहावीची परीक्षा देत होता. दोन दिवसांपासून त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. त्याची तब्येतही बरी नव्हती. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या शयनगृहात गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येआधी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याला परीक्षेत गणिताचा पेपर कठीण गेला होता. त्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ssc students committed suicide in bhayander