ठाणे : सी.पी. गोएंका शाळेत भाजपचे आमदार संजय केळकर हे त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसह शाळेमध्ये शिरले. परंतु पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर काढा अशी मागणी पालकांच्या काही गटाने केली. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर पडावे लागले. दुपारी उशिरापर्यंत पालकांचा शाळेबाहेरील ठिय्या कायम होता.

सी. पी. गोएंका शाळेने काढलेल्या सहलीमध्ये दुसरी इयत्तेतील काही विद्यार्थ्यांचा बसगाडीमध्ये जावेद खान याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेच्या निषेधासाठी आणि शाळेच्या व्यवस्थापन विभागावर कारवाईच्या मागणीसाठी पालक गुरुवारी सकाळपासून शाळेबाहेर जमले आहेत.

हेही वाचा – ठाणे : सुट्ट्यांच्या दिवसांत वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या सेवा रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

हेही वाचा – डोंबिवलीतील सराईत गुंडाची कोल्हापूर कारागृहात रवानगी, धोकादायक गुन्हेगार अक्षय दाते एक वर्षासाठी स्थानबद्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांचे शिष्टमंडळ आणि शाळा विश्वस्तांची बैठक सुरू आहे. दुपारी भाजपचे आमदार संजय केळकर काही पदाधिकाऱ्यांसह शाळेमध्ये शिरले. पालकांना शाळेबाहेर रस्त्यावर उभे राहून आंदोलन करावे लागत होते. त्यामुळे काही पालकांनी नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर पडावे लागले.