ठाणे – मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील तानसा धरण बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनातर्फे धरण परिसरातील आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या पातळीत वाढ झाल्याने धरण ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे सद्यस्थितीत धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट चारवर दर्शक नसल्याने प्रवाशांची गैरसोय

हेही वाचा – मुंबई- नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.