ठाणे : कळवा येथे एका अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी रुदेश रमेश शिंदे याला ठाणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश भागवत यांनी दोषी ठरवत १० वर्ष सक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कळवा येथे आरोपी रुदेश रमेश शिंदे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या गुन्ह्यात कळवा पोलीसांनी त्याला अटक केली होती.
या गुन्हयाच्या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस निरीक्षक श्री. अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तपासी अधिकारी डी.एस यादव आणि त्यांचे तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या गुन्हयाची सुनावणी नुकतीच झाली. या सुनावणीत गुन्हयातील आरोपी रूदेश रमेश शिंदे यास दोषी ठरवुन १० वर्ष सक्त सश्रम कारावास आणि १५ हजार रूपये दंडाची रक्कम भरली नाही तर, तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.