कल्याण – एका रिक्षा चालकाने कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात दांडके मारून तिला बेशुध्द करत तिची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी रिक्षा चालकास अटक केली आहे. अलीमुना अन्सारी (३५) असे मयत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी मयुद्दीन (३८) याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील मायलेकांच्या हत्येमागचे नवे कारण समोर; प्रेमसंबंध आणि कर्जामुळे हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयुद्दीन हा टिटवाळा येथे रिक्षा चालविण्याचे काम करतो. मागील काही महिन्यांपासून मयुद्दीन याचे पत्नी अलीमुना हिच्याबरोबर कौटुंबिक वादातून भांडण होत होते. असेच सोमवारी सकाळी त्यांच्यात भांडणे झाले. राग अनावर झाल्याने मयुद्दीन याने लाकडी दांडक्याने अलीमुना हिच्या डोक्यात फटके मारून तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुध्द पडली. त्यानंतर आरोपीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार समजताच टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मयुद्दीनवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.