श्रीनगर येथील शिवशक्तीनगर भागात बुधवारी दुपारी जीजाबाई केदारे (६५) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या घरात आढळून आला. त्यांच्या अंगावरील दागिने हे गायब असून चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज श्रीनगर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
शिवशक्तीनगर येथील जलवाहिनी परिसरात जीजाबाई या एकट्याच राहत होत्या. बुधवारी दुपारपासून त्यांच्या घरामधून दुर्गंधी येऊ लागली होती.

हेही वाचा >>> सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत तीन वातानुकूलित लोकल सुरू करा ; कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाज्याचे कूलूप तोडून आत प्रवेश केला असता, जीजाबाई यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने गायब असून बाहेरून घराच्या दरवाजावर कूलूप होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.