ठाणे – एमटीएनएल सेवा बीएसएनएल मध्ये स्थलांतरित करत असताना एमटीएनएल कर्मचारी व अधिकारी यांच्या कायम व सुरक्षित भविष्याचा निर्णय घ्यावा, वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवा अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी ठाण्यातील चरई येथे असलेल्या एमटीएनएल कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
महानगर टेलिफोन निगम कामगार संघ व एमटीएनएल ऑफीसर्स असोशिएशन मुंबई यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले होते.
एमटीएनएल सेवा बीएसएनएल मध्ये स्थलांतरित करत असताना एमटीएनएल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम व सुरक्षित भविष्याचा निर्णय घेण्यात यावा, ११ मार्च २०२५ चा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एमटीएनएल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवावे, जेएनसी मध्ये सादर केलेले एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे दीर्घ काळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी जेएनसी बैठक ताबडतोब निश्चित करावी, ५ टक्के आयडीए मर्जर १ जानेवारी २०१८ च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एमटीएनएल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू करावे. अशा विविध मागण्यांसाठी एमटीएनलच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.