ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून शहरात वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे.ठाणे पोलिसांनी वाहतुकी संदर्भात अडचणी असल्यास नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर केले आहेत. वाहतुक शाखेच्या १८ उपविभागांसाठी १८ क्रमांक प्रसारित करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे शहरात विविध प्रकल्पांची सुरु असलेली कामे, खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे. घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज वाहतुक कोंडी होत असते. वाहतुकी संदर्भात काही अडचणी आल्यास नागरिक एक्स या समाजमाध्यमाद्वारे पोलिसांसोबत संपर्क साधत असतात. परंतु आता ठाणे पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराच्या १८ उपविभागासाठी १८ मदत क्रमांक जाहीर केले आहेत. ठाणे पोलिसांकडून आयोजित केलेल्या ‘डिजीटल वारी’ या उपक्रमात या मदत क्रमांकाचा शुभारंभ करण्यात आला.
विभाग – मदत क्रमांक
ठाणेनगर- ८६५५६५४१७१
राबोडी – ८६५५६५४१७२
नौपाडा – ८६५५६५४१७३
कळवा- ८६५५६५४१७४
मुंब्रा – ८६५५६५४१७५
कोपरी- ८६५५६५४१७६
वागळे इस्टेट- ८६५५६५४१७७
कापुरबावडी- ८६५५६५४१७८
कासारवडवली- ८६५५६५४१७९
भिवंडी शहर – ८६५५६५४१८०
कोनगाव- ८६५५६५४१८१
नारपोली – ८६५५६५४१८२
कल्याण – ८६५५६५४१८३
डोंबिवली – ८६५५६५४१८४
कोळसेवाडी – ८६५५६५४१८५
उल्हासनगर – ८६५५६५४१८६
विठ्ठलवाडी – ८६५५६५४१८७
अंबरनाथ – ८६५५६५४१८८