ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या लांबीकरणाऐवजी रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या महिन्याभरात रुंदीकरणाचे काम सुरू केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. स्थानकातील सर्वाधिक गर्दीच्या फलाटांपैकी फलाट क्रमांक पाच आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवसांत या फलाटाचे काम केले जाणार आहे. तसेच अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे काम करण्याचे रेल्वे प्रशासनाने नियोजन आहे. फलाटाची रुंदी वाढल्यास प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मुंबईहून कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर, पाचला जोडून असलेल्या फलाट क्रमांक सहावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबतात. काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना देखील फलाट क्रमांक पाच आणि सहावर थांबा मिळतो. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकातील फलाटांच्या तुलनेत फलाट क्रमांक पाच आणि सहावर गर्दीचे प्रमाण अधिक असते. प्रवाशांच्या तुलनेत फलाटाची रुंदी अत्यंत कमी आहे.

Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत
Titwala
टिटवाळ्याजवळ लोकलवर भिरकावलेल्या दगडीत दोन प्रवासी जखमी

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाच्या सरी

एखादी रेल्वेगाडी फलाटावर येत असल्याचे प्रवाशांची तुफान गर्दी उसळते. अनेकदा प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. रात्रीच्या वेळेत प्रवासा दरम्यान फलाटावर उभे राहाणे कठीण होते. चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती असते. या फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. फलाटाची लांबी पुरेशी आहे. त्यामुळे रुंदी वाढवावी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या पाहाणीत समोर आले होते. त्यामुळे फलाट क्रमांक पाचची रुंदी दोन मीटर इतकी रुंदी वाढविण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या कामांच्या हालचालिकांना आता वेग आला आहे.

हेही वाचा : टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू

रुंदीकरणासाठी येथील फलाट क्रमांक पाच रेल्वे रुळ काढून ते काही अंतर पुढे नेले जाणार आहे. रुंदी वाढल्यास प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळेल. तसेच फलाट क्रमांक पाचला जोडून असलेल्या फलाट क्रमांक सहावर होणारी गर्दी देखील नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. फलाटच्या रुंदीकरणाची तयारी सुरू झाली आहे. रुंदीकरणासाठी लागणारे साहित्य बनविले जात आहे. येत्या महिन्याभरात हे काम सुरू होऊ शकते. हा फलाट गर्दीचा असल्याने मोठा ब्लाॅक घ्यावा लागणार आहे. तसेच दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव छापू नये या अटीवर सांगितले.