जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी आज, शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये सोडतीद्वारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे या आरक्षणाचा कुणाला होणार फायदा तर कुणाला बसणार फटका, हे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रक्रीयेमुळे इच्छूकांची धाकधूक वाढली –

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या सोडतीला आज दुपारी ११ ते १२ वाजेच्यादरम्यान सुरुवात होणार आहे. यामध्ये ठाणे महापालिकेत १०.४ टक्के तर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत २७ टक्के इतके नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण जाहीर होणार असून या प्रक्रीयेमुळे इच्छूकांची धाकधूक वाढली आहे.

Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

ठाणे महापालिका क्षेत्रात १०.४ टक्के इतके आरक्षण लागू होणार –

ठाणे महापालिकेची डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे, कल्याण-डोंबिवलीची अत्रे नाट्यगृहात तर, उल्हासनगरची टाऊन हॉल मध्ये आरक्षण सोडतचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवक संख्या १४२ इतकी आहे. बांठीया आयोगानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात १०.४ टक्के इतके आरक्षण लागू होणार आहे. यामुळे ओबीसी समाजाला १५ जागा मिळणार असून त्यापैकी ८ जागा राखीव असणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १३३ इतकी आहे. याठिकाणी २७ टक्के इतके ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार आहे. यामुळे ओबीसी समाजाला ३५ जागा मिळणार असून त्यापैकी १८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर, उल्हानगर पालिकेत एकूण नगरसेवक संख्या ८९ इतकी आहे. याठिकाणी २७ टक्के इतके आरक्षण लागू होणार असून त्यानुसार ओबासी समाजाला २४ जागा मिळणार आहेत. त्यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.