scorecardresearch

डोंबिवलीत पलावामध्ये घर मालकाकडून भाडेकरूला धमकी; घरातील सामान फेकले

डोंबिवलीत पलावा नागरी वसाहतीमधील पोशिओ लेकशोअर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचे घरातील सामान या घराच्या मालकाने रागाच्या भरात घराबाहेर फेकून दिले.

डोंबिवलीत पलावामध्ये घर मालकाकडून भाडेकरूला धमकी; घरातील सामान फेकले
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

डोंबिवली: डोंबिवलीत पलावा नागरी वसाहतीमधील पोशिओ लेकशोअर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचे घरातील सामान या घराच्या मालकाने रागाच्या भरात घराबाहेर फेकून दिले. ज्येष्ठ नागरिकाला मारण्याची धमकी दिली. सामान फेकण्याच्या झटापटीत ज्येष्ठ नागरिकाच्या हाताचे बोट मोडले आहे.

सय्यद हुसेन सय्यद (६५, रा. पोशीओ ई, लेकशोर ग्रीन, खोणी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. किष्णन नारायणकुमार सिन्हा (३५, रा. डोंबिवली) असे आरोपी घर मालकाचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सय्यद यांच्या तक्रारीवरुन सिन्हा यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवलीत तरुणांच्या दोन गटात हाणामारी

पोलिसांनी सांगितले, सय्यद हे ज्येष्ठ नागरिक सिन्हा यांच्या पलावातील घरात भाडेकरू म्हणून राहतात. सय्यद यांनी घर सोडावे म्हणून सिन्हा हे तगादा लावत आहेत. ते ऐकत नसल्याने रविवारी दुपारी बारा वाजता क्रिष्णन सिन्हा हे सय्यद यांच्या घऱात जबरदस्तीने घुसले. सय्यद यांची परवानगी न घेता त्यांचे घरातील सामान घराबाहेर फेकून दिले. सामानाची मोडतोड केली. या झटापटीत सय्यद यांच्या हाताचे बोट मुरगळून दुखापत झाली आहे. हा प्रकार केल्यानंतर सिन्हा यांनी सय्यद यांना मारण्याची धमकी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:50 IST

संबंधित बातम्या