रक्षाबंधना निमित्त मोठ्या संख्येने वाहने गुरुवारी रस्त्यावर आल्याने कल्याण-शिळफाटा रस्ता, डोंबिवली, कल्याणमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. शिळफाटा रस्त्यावर मानपाडा ते पलावा चौकापर्यंत जाण्यासाठी एक तास लागत होता.

कल्याण कडून पत्रीपूल मार्गे अनेक वाहने डोंबिवलीत ठाकुर्लीतून येत होती. ठाकुर्ली हनुमान मंदिरा जवळील अरुंद रस्ता, त्यात डोंबिवलीत पेंडसेनगर, डोंबिवली पश्चिमेकडून येऊन कल्याणकडे जाणारी वाहने एकाच वेळी अरुंद रस्त्यावर समोरासमोर आल्याने ठाकुर्लीतील रस्ता वाहतूक कोंडीत अडकला होता.

अनेक वाहन चालकांनी घरडा सर्कलमार्गे डोंबिवलीत जाण्याचा प्रयत्न केला. घरडा सर्कल ते टिळक पुतळापर्यंतचा रस्ता वाहतूक कोंडीत अडकला होता. गोग्रासवाडी, संत नामदेव पथावरुन येणारी वाहने या कोंडीत घुसल्याने वाहन कोंडीत भर पडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई, पनवेल, ठाणे भागातून डोंबिवलीत वाहनाने बहिणीकडे येणारे भाऊराया पलावा चौक, काटई, रिव्हरवूड पार्क येथे अडकून पडले होते. शिळफाटा दिशेने कल्याणकडे येण्यासाठी एक ते सव्वा तास लागत होता, असे प्रवाशांनी सांगितले.