ठाणे : ठाण्यात गुरूवार सकाळपासून सुरू असलेला पाऊस आणि रस्त्यातील खड्डे यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. सकाळपासून घोडंबदर, गोकूळनगर, मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत.

हेही वाचा… खड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद  महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बुजविलेले रस्त्यातील खड्डे पुन्हा उखडण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतूकीवर होऊन वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल परिसर, माजीवडा- गोकूळनगर मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूल ते तीन हात नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना कोंडीत अडकावे लागले.