Premium

भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

प्रसाद चौवले (२६) आणि किरण कोंडा (२७) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

two people arrested case selling 41 kg ganja
भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त दोघांना अटक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: भिवंडी येथील रांजनोली नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रसाद चौवले (२६) आणि किरण कोंडा (२७) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

रांजनोली नाका येथील पूलाखाली दोन जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी दोघेजण एका कारमधून येत होते.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

पोलिसांनी ही कार अडविली. त्या कारमध्ये ४१ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारमधील प्रसाद आणि किरण या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two people arrested in the case of selling 41 kg ganja dvr

First published on: 30-05-2023 at 16:35 IST
Next Story
डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा