Thane ठाणे: ‘माझ्यासाठी गडकरी रंगायतन हे फक्त एक नाट्यगृह नाही तर, emotion (भावना) आहे. जीव की प्राणच आहे म्हणा ना!’ अशी भावान एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ती पुढे म्हणाली, नव्या गडकरीत नव्या जोमात प्रयोग करायचा हा आनंद काही वेगळाच असणार आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं आणि प्रतिष्ठित नाट्यगृह मानले जाते. हे केवळ एक वास्तू नाही, तर मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा साक्षीदार आहे. ठाणेकर प्रेक्षकांच्या सांस्कृतिक आणि नाट्यरसिकतेची ओळख जपणारे हे नाट्यगृह अनेक कलाकारांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरले आणि अजूनही ठरत आहे. राम गणेश गडकरी रंगायतनची स्थापना १९७० च्या दशकात झाली. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे नाट्यगृह शहराच्या सांस्कृतिक तसेच राजकीय जडणघडणीचे साक्षीदार आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले होते. या कामामुळे जवळपास अकरा महिने हे नाट्यगृह बंद होते. गडकरी रंगयतन बंद असल्यामुळे नाट्यप्रेमी रसिक तसेच कलाकारांचाही काहीसा हिरमोड झाला होता. परंतू, आता गडकरी रंगायतन नव्या रुपात आपल्या समोर येणार याचा आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अखेर १५ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतनचा अखेर पडदा उघडला. तेव्हा रसिक प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी गडकरीच्या नव्या रुपा बद्दल अनेकांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केला होत्या.

तर, कलाकार मंडळी देखील कधी एकदा आपल्या नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनला होतोय याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशाच प्रकारे एका कलाकाराने आपली भावना समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने गडकरी रंगायतनात तिच्या होणाऱ्या एका प्रयोगाबाबत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहेय त्यात ती म्हणाली ‘नव्या गडकरीत, नव्या जोमात प्रयोग करण्याचा आनंद!’ अशी पोस्ट लिहिली आहे.

विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर गडकरी रंगायतनविषयी भावना व्यक्त केल्या

ठाण्यातले गडकरी रंगायतन आता बंद असणार हे समजलं तेव्हा आनंद होताच की, आपलं नाट्यगृह आता अपग्रेड होणार,पण तोवर तिथे प्रयोग करता येणार नाही ह्याचं थोडं वाईटही वाटलं. पण आता ती प्रतीक्षा संपली! माझ्यासाठी गडकरी रंगायतन हे फक्त एक नाट्यगृह नाही तर emotion आहे. जीव की प्राणच आहे म्हणा ना! The दमयंती दामले चे प्रयोग सुरू झाले तेव्हापासून माझ्या ह्या रंगमंचाला मी खूप मिस करत होते. तो दिवस आला finally! ठाणे ही खऱ्या अर्थी माझी कर्मभूमी असल्याने, माझ्या comfort zone मध्ये ह्या नाटकाचा प्रयोग करण्याची मजा काही औरच आहे. ठाणेकरांची उस्फूर्त दाद, उत्तम प्रतिसाद हे सगळं ह्या प्रयोगात वसुल करून घेणारे मी.. कधी एकदा २१ तारीख येते आणि गडकरीमध्ये प्रयोग करते असं झालंय!