ठाणे : बदलापूर येथील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्याचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. त्याचा मृतदेह दफन करण्यास ठिकठिकाणी विरोध होऊ लागला आहे.

गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा येथे अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करू नये यासाठी कळवा पोलिसांना पत्रव्यवहार केला आहे. मृतदेह दफन केल्यास रोषाला सामोरे जावे लागले असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले.

हे ही वाचा…अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. त्याच्या मृतदेहाला दफन करण्यास बदलापूरमध्ये विरोध केला जात आहे. त्यामुळे दफनविधीसाठी ठाणे पोलीस जागेचा शोध घेत आहेत. परंतु कळव्यामधूनही आता त्यास विरोध झाला आहे. मनसेचे ठाणे उपशहराध्यक्ष सुशांत सुर्यराव यांनी कळवा पोलीस ठाण्याला पत्र लिहीले आहे. कळवा शहरातील स्मशानभूमीत विकृत्त मनोवृत्ती असलेला गुन्हेगार अक्षय शिंदे याला दफन करण्यास समस्त नागरिकांचा व मनसेचा विरोध आहे. आम्ही ही दफन विधी करू देणार नाही. तरी त्याचे दफन अन्य ठिकाणी करावे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे या पत्रात म्हटले आहे.