लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : सासरच्या जाचाला कंटाळून एका ३२ वर्षीय महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्नेहा चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल तिने आत्महत्येपूर्वी तिचा भाऊ आणि वहिनीला व्हॉट्सॲपवरून संदेश पाठविला होता. त्याआधारे नारपोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिलेची सासु आणि नणंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिकेतील ॲन्थोनीचे कामगार कंत्राटीच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथल काल्हेर भागात स्नेहा चव्हाण या पती आणि सासूबरोबर वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी स्नेहा हिच्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर स्नेहा हिला तिची सासू आणि नणंद शिवीगाळ करत असे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्नेहा ही शयनगगृहात गेली. त्यानंतर तिने सासरच्या त्रासाबद्दल भावाला आणि वहिनीला व्हॉट्सॲपवरून संदेश पाठविला होता. हा संदेश पाहून तिच्या भावाने तात्काळ स्नेहा हिच्या पतीला संपर्क साधला. स्नेहाच्या पतीने तिला संपर्क साधला. परंतु तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे स्नेहाचे पती तात्काळ घरी परतले. त्यावेळी शयनगृहाचे दार बंद होते. त्यांनी दार उघडले असता, स्नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी बुधवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.