20 September 2020

News Flash

Viral Video : महाकाय पाणघोड्यासमोर सिंहिणीचा निभाव लागेना

इथे जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो

(छाया सौजन्य : Maasai Mara Sightings)

जंगलात प्रत्येकाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु असतो. जंगलात जिवंत राहायचं असेल तर कोणाची तरी शिकार करावी लागते किंवा कोणाला तरी शिकार व्हावी लागते. पण शिकार करताना जरा जरी आतताईपणा केला तर याची किती मोठी किंमत चुकवावी लागते याची कल्पना आपल्याला नसते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केनयातल्या मसाई मारातला हा व्हिडिओ आहे.

एका सिंहिणीनं मोठ्या पाणघोड्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या काहीच सेकंदात असं धाडस करणं तिला खूपच महागात पडलं. पाणघोड जमिनीवर पहुडला आहे तेव्हा आपण त्याची सहज शिकार करू शकतो असं तिला वाटलं पण तिच्यापेक्षाही तो कैकपटीनं ताकदवान आहे याचा साधा अंदाजही तिला बांधता आला नाही. पाणघोड्याची शिकार करण्यासाठी तिने त्याच्यावर झडप मारली खरी पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा महाकाय प्राणी जमिनीवरून उठला आणि तिला तोंडात पकडून चितपट केलं. तेव्हा बिचाऱ्या या सिंहिणीला उपाशी पोटीच परतावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 10:32 am

Web Title: a lioness try to attacks on hippo
Next Stories
1 वयाच्या ९१ व्या वर्षी आजींनी मिळवली डिग्री
2 Viral Video : छत्री डोक्यावर घेऊन एक्स्प्रेस इंजिन चालवण्याची मोटरमनवर वेळ
3 पायलटच्या चुकीमुळे पाहुणे लग्नमंडपाऐवजी पोहोचले जेलमध्ये!
Just Now!
X