16 January 2018

News Flash

Video : छेडछाड करणा-या रोड रोमियोला असा शिकवला धडा

महिलेने दिला भर रस्त्यात चोप

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:18 PM

उत्तर प्रदेशमधल्या बागपत येथे जिल्हाधिका-यांच्या ऑफिससमोर एक संतापजनक प्रकार घडला. ( छाया सौजन्य : ANI )

देशात महिला सुरक्षित नाही, महिला छेडछेडाची प्रकार सर्रास घडत आहे. या रोडरोमियांना महिलांबद्दल आदर नाहीच पण कायद्याचा धाकही राहिला नाही. बंगळुरुमध्ये झालेले महिला विनयभंगाचे प्रकरण अजूनही देश विसरला नाही. छेडछाड करू पाहणा-या एका गुंडाला चैताली वासनिक या तरुणीने शिकवलेला धडाही चांगला लक्षात आहे. छेडछेडा करणा-या पुरुषांना इंगा दाखवणा-या धाडसी महिला देखील आहे. जिल्हाधिका-यांच्या ऑफिसबाहेर छेड काढणा-या एका महिलेने एका रोडरोमियोला चांगलाचा धडा शिकवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : ही मुघल राजकन्या आता झोपडपट्टीत राहते!

Viral : ‘या’ जांभळ्या पक्ष्याला फेसबुकवरून हटवा रे!

उत्तर प्रदेशमधल्या बागपत येथे जिल्हाधिका-यांच्या ऑफिससमोर एक संतापजनक प्रकार घडला. येथे आलेल्या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न एकाने केला. आपली छेड काढणा-या या व्यक्तीला महिलेने धडा शिकवला. या महिलेने या व्यक्तीला भररस्त्यात चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

First Published on February 17, 2017 4:59 pm

Web Title: a woman beats up alleged eve teaser in baghpat
  1. No Comments.