अॅमेझॉन ही इ-कॉमर्स साईट जगभरात प्रसिद्ध आहे. एका क्लिकवर हव्या त्या वस्तू येथे उपलब्ध होतात त्यामुळे या साइटला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता लाखो वस्तूंचं भांडार असणाऱ्या या साईटवर हवी ती वस्तू सापडणार नाही असं क्वचितच होत असेल आणि समजा सापडलीच नाही तर दुसऱ्या असंख्य साईट्स आहेतच. पण आपण शोधत असलेली गोष्ट मिळाली नाही म्हणून आदिती नावाच्या तरुणीनं चक्क ट्विट करत अॅमेझॉनकडे मदत मागितली. ‘तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात मोठी ई- कॉमर्स साइट म्हणवून घेता पण गेल्या कित्येक तासांपासून शोध घेतल्यानंतरही मला जे हवं होतं ते मिळालंच नाही’ असं अॅमेझॉनला मेन्शन करत या तरुणीनं ट्विट केलं.

अर्थात अॅमेझॉननं त्वरित आपल्या ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेतली. ग्राहकांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेण्याचा आणि त्याप्रमाणे सेवा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही शोध घेत असलेली गोष्ट कोणती आहे हे आम्हाला कळू शकेल का? असा प्रश्न अॅमेझॉनच्या अधिकृत हेल्प सेंटरकडून ट्विटद्वारे तिला विचारण्यात आला. त्यावर मला प्रेम करण्यासाठी जोडीदार हवाय असं ट्विट तिनं केलं.

ग्राहकांची ही अजब मागणी ऐकून अॅमेझॉननंही हटके पद्धतीनं याचं उत्तर दिलं आहे. आता तुम्हीच पाहा अॅमेझॉननं तिच्या अजब मागणीवर काय उत्तर दिलंय ते. हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.