हत्तीचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी फुलपाखराच्या मागे धावताना, कधी खेळताना, घास खाताना तर कधी जंगलात मुक्त संचार करत असतानाच्या हत्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. अशातच संतापलेल्या हत्तीचा व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीच शांत आणि बुद्धीवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा हत्ती मात्र या व्हिडीओमध्ये भयंकर चिडलेला दिसतोय.

या हव्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण सायकलसह जमिनीवर पडला आहे. हत्ती ती सायकल सोडेंने उचलण्याचा प्रयत्न करतो. हत्तीने सायकल बाजूला करून तरुणाला सोंडेनं इकडे-तिकडे ढकलण्याचाहू प्रयत्नही केला. काही सेकंद श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या या व्हिडीओत हत्ती या तरुणाला चिरडतो की काय? असंही वाटतं मात्र तरुण आपला जीव मुठीत घेऊन मोठ्या युक्तीनं या संकटातून वाचतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओची खूप चर्चा देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी दिग्विजय सिंह खाटी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर कॅप्शन देताना ते लिहितात की या तरुणानं चालाखीनं आपला जीव थोडक्यात वाचवला.

दोन  मिनिटांच्या या व्हिडीओला आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

 

आणखी वाचा :

Viral Video : संतापलेल्या हत्तीसमोर दुचाकी आली अन् …

हत्तीच्या पिलाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही लहानपण आठवेल