News Flash

आनंद महिंद्रांनी ‘करुन दाखवलं’… यानंतर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या बैठकीत दिसणार नाही ‘ही’ गोष्ट

शब्द दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये महिंद्रांनी घेतला निर्णय

आनंद महिंद्रा 'करुन दाखवले'

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटवर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. या माध्यमातून मिळालेल्या सुचना आणि सल्ले अनेकदा ते गांभीर्याने घेतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचा कल असतो. अशाच एका तरुणीने ट्विटवरुन दिलेल्या सल्लामुळे महिंद्रांनी आपल्या कंपनीच्या बैठकींसंदर्भात एक महत्वाचा पर्यावरणपुरक निर्णय घेतला आहे.

झालं असं की आनंद महिंद्रा यांनी १६ जुलै महिन्यामध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या बोर्डरुममधील बैठकीचा फोटो ट्विट केला होता.

त्या फोटोवर एका तरुणीने आनंद महिंद्रा यांना रिप्लाय करुन एक सल्ला दिला होता. ‘तुम्ही अशा बैठकींना एकदा वापरुन फेकून देतात अशा प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी बोर्डरुममध्ये स्टीलच्या पुन्हा वापरता येईल असा बाटल्या असाव्यात’ असं ही तरुणी आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती.

महिंद्रा यांनी या ट्विटची दखल घेत या तरुणीला उत्तरही दिले होते. ‘हो लवकरच या प्लास्टिकच्या बाटल्या बंद केल्या जातील. आम्हालाही त्या बाटल्या तेथे पाहून लाज वाटली,’ असं महिंद्रांनी ट्विट करुन सांगितलं होतं.

अवघ्या दोनच महिन्यांमध्ये आनंद महिद्रांनी दिलेला शब्द खरा ठरवला. महिंद्रांनी यापुढे कंपनीच्या बोर्डरुममध्ये पुन्हा वापरता येतील अशा धातूच्या बाटल्याच वापरल्या जातील असं सांगणारं ट्विट केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी कंपनीच्या एका विभागाने प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय शोधला असल्याचेही सांगत त्यांना या बाटल्यांचा फोटो ट्विट केला आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी या नवीन प्रकारच्या बाटल्या वापरण्यात याव्यात यासाठी काम करणाऱ्या कंपनीमधील रिटेल टीमचेही त्यांनी आभार मानले आहेत. तसेच या नवीन बाटल्या पुन्हा वापरता येण्याबरोबरच दिसायलाही प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा अधिक सुंदर असल्याचे मत महिंद्रा यांनी ट्विटवरुन व्यक्त केले आहे.

महिंद्रा यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. देशभरामध्ये एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर (चॉकलेटचे रॅपर्स, वेफर्स पाकीटे वगैरे) बंदी घालण्याचा केंद्राचा विचार सुरु आहे. २०२२ पर्यंत अशाप्रकारच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंतीपासून या मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 3:46 pm

Web Title: as promised anand mahindra replaces plastic bottles in boardrooms scsg 91
Next Stories
1 मिया खलिफा म्हणते, ‘मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करते हे घरी कळलं आणि…’
2 ‘King of Instagram’ भारतात दाखल; त्याच्या घड्याळाची किंमत एक बंगल्याच्या किंमतीहूनही अधिक
3 बर्गरमुळे आठ वर्षे मरणयातना; अखेर झाला लहानग्याचा मृत्यू