03 March 2021

News Flash

रामदेव बाबांच्या जीन्सचा लूक झाला व्हायरल

बघा नेटीझन्सने बाबांसाठी तयार केले जीन्सचे डिझाईन

नेटीझन्सने रामदेव बाबांच्या जीन्सचा पहिला वहिला लूक लाँच केला आहे.

लवकरच आपण जीन्स देखील आणणार आहे असे रविवारी जाहिर करून योगगुरु बाबा रामदेव यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आणि या घोषणेनंतर रामदेव बाबांची ही जीन्स पँट असणार कशी याची चर्चा सुरू झाली. साहजिकच त्याची आता सोशल मीडियावर चर्चा रंगतेय म्हटल्यावर त्यावर लक्ष ठेवलच पाहिजे. आता हेच बघा ना रामदेव बाबांना देखील माहित नसेल पण त्याआधीच नेटीझन्सने रामदेव बाबांच्या जीन्सचा पहिला वहिला लूक लाँच केला आहे. अर्थात रामदेव बाबांचा आणि याचा काहिच संबंध नसला तरी सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवण्याचे प्रकार सर्रास चालतात त्यामुळे त्याच खिल्लीचा एक भाग म्हणून की काय रामदेव बाबांच्या या जीन्सचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
या जीन्सला भस्म, दुर्वा इतकच कशाला रुद्राक्षही लावल्या आहेत बेल्टच्या जागी फुलांची माळ लावली आहे. आता यामागे नेमके कोणाचे डोके आहे माहित नाही पण या हर्बल जीन्सचा फोटो मात्र तूफान व्हायरल होत आहे. बाबांची ही जीन्स वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरूवातील बाजारात विक्रिसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रामदेव बाबांच्या कपड्यांच्या ब्रँडचे नाव कदाचित ‘परिधान’ असे असू शकते अशा चर्चा सध्या आहे. फक्त जीन्सच नाही तर रामदेव बाबा महिला आणि पुरूषांसाठी एथनिक म्हणजे पारंपारिक कपडे देखील आणण्याच्या विचारात आहेत. बाबांच्या जीन्स पँटच्या घोषणेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ‘मी बाबा आहे पण याचा अर्थ माझा आधुनेकतेला विरोध आहे असा होत नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील बाबांनी दिली आहे.
भविष्यात आपले उत्पादन लवकरच पाकिस्तान, अफगाणिस्तान बांग्लादेशात पोहचतील असा दावा देखील बाबांनी केला आहे. तसेच सौदी अरेबियासारख्या देशांत आपली उत्पादने लोकप्रिय आहेत असाही दावा बाबांनी केला आहे. माझ्या फॉलोअर्सने मला विविध कल्पना दिल्या आहे त्यातून प्रेरणा घेऊन मी कपड्यांचे कलेक्शन सुरू करणार आहे असे बाबा सांगितले खरे आता नेमका हाच मुद्दा घेऊन नेटीझन्सने बाबांना सल्ले दिले आहे. बाबा आपल्या फॉलोअर्सचे ऐकतात मग आम्ही काही नाव देतो त्यांचेही उत्पादन बाबांनी करावे अशा प्रतिक्रिया येत आहेत. आता तुम्हीच पहा बाबांना नेटीझन्सने काय सल्ले दिले आहेत ते.

Next Stories
1 उबेर टॅक्सी चालकाने तरुणीला दिली टॅक्सीतून फेकून देण्याची धमकी
2 अरविंद केजरीवाल म्हणतात, आरएसएस म्हणजे रिलायन्स स्वयंसेवक संघ
3 अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेल्या रेश्माने केला न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक
Just Now!
X