इटलीमधली बोलोग्ना शहरात असलेल्या नेपच्युनचा पुतळ्याचा फोटो फेसबुकने चक्क ब्लॉक केला होता. न्यूड पॉलिसीचे कारण पुढे करून हा फोटो ब्लॉक करण्यात आला होता. फेसबुकच्या नियमावलीत अश्लील किंवा नग्न फोटो ब्लॉक केले जातात. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर चर्चिले गेल्यानंतर फेसबुकने हा फोटो अनब्लॉक केला.

VIRAL VIDEO : सापाने चक्क अजगराला गिळले

इटलीतील लेखिका इलिसा बारबरीने फेसबुक पेज तयार केले होते. यावर तिने या नेपच्युनच्या पुतळ्याचा फोटो ठेवला होता. पण फेसबुकने यावर आक्षेप घेतला. इटलीची शान असलेल्या या जगप्रसिद्ध पुतळ्यावर अश्लिल असल्याचा शेरा फेसबुकने कसा मारला असा सवाल या लेखिकने केला. सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर फेसबुकने यावर आपले स्पष्टीकरण दिले. १५ व्या शतकात बोलोग्ना शहरातील या चौकात हा कारंजा बांधण्यात आला आहे. नेपच्युन ही प्राचीन रोममध्ये जलदेवता होती. त्यामुळे येथल्या कारंज्यावर वरच्या भागात हातात त्रिशूल असलेला नेपच्युनचा पुतळा आहे.

वाचा : लॉटरी जिंका आणि कोंबडी, मासे, बदक मिळवा!

हा कारंजा जुना आहे. याचा फोटो लेखिकेने फेसबुकवर टाकला असता त्यावर फेसबुकने आक्षेप घेतला. फेसबुकच्या नियमावलीत हा फोटो बसत नाही, त्यामुळे फेसबुकने तो फोटो ब्लॉक केला होता.