सध्या सोशल मीडियावर नोकियाच्या ३३१० हँडसेटचीच चर्चा आहे. हा फोन लवकरच कंपनी लाँच करणार आहे अशी बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिली. त्यानंतर लोकांच्या आनंदाला पारवा उरला नाही. या निमित्ताने अनेकांनी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. रफ अँड टफ युज आणि लाँग बॅटरी लाईफमुळे या फोनची आजही अनेक जण आठवण काढतात. २००० साली हा फोन लाँच करण्यात आला होता तेव्हा अनेकांचा हा पहिलाचा हँडसेट असेल. म्हणूनच या फोनशी अनेकांची इमोशनल अटॅचमेंट जोडलेली असते. ब्रिटनमध्ये राहणा-या डेव्ह मित्शेल यांचीही या हँडसेटशी अशी अटॅचमेंट जोडली गेली आहे की गेल्या १७ वर्षांपासून आपण हाच फोन वापरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वाचा : दोन हजाराच्या नोटांनी सजवलेल्या गाडीमागचे व्हायरल सत्य उघड

स्मार्टफोनच्या युगात ३३१० कधीच मागे फेकला गेला. बाजारातून जरी हा फोन कधीचा बाहेर पडला असला तरी आजही अनेकांच्या हृद्यातून मात्र तो बाहेर गेला नाही. आजही या फोनचे चाहते जगभरात असतील. नोकियाच्या ३३१० हँडसेटचे असेच नि:स्सीम चाहते आहेत ब्रिटनचे ४९ वर्षीय डेव मित्शेल. गेल्या सतरा वर्षांपासून आपण हाच फोन वापरत असल्याचे ते सांगत आहे. हा फोन कित्येकदा आदळला, तो पाडला पण त्याला काहीच झाले नाही असे ते अभिमानाने सांगतात. लोक स्मार्टफोनच्या युगात वावरत असताना डेव्ह मात्र ३३१० जुना हँडसेट वापरायचे यावरून अनेकदा त्यांची खिल्ली उडवली गेली. त्यांच्या मुलांनी त्यांना स्मार्टफोनही आणून दिला पण स्मार्ट फोनची बॅटरी लगेच डाऊन व्हायची मात्र हा फोन तीन ते चार दिवस चार्ज करण्याचीही गरज भासत नाही असेही ते म्हणाले.

Viral: ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ व्हिडिओला ‘इंडिया सेकंड’ने प्रत्युत्तर

बुधवारपासूनच हा फोन लवकरच रिलाँच करण्यात येईल असे बोलले जात आहे. गॅझेट्स संदर्भातील अपडेट्स देणा-या पत्रकार इवान ब्लास यांनी नोकिया ३३१० च्या रिलाँचींगची बातमी दिली आहे. या महिन्यात या कंपनीकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल असेही सांगितले. नोकिया ३३१० मध्ये कॅमेरा नसला की तरी दिर्घ बॅटरी लाईफ आणि टिकाऊपणा हे त्याचे वैशिष्ट होतं. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हे फोन बाजारात आणणार असल्याची चर्चा आहे. स्मार्ट फोनची बॅटरी लाईफ ही कमी असते त्यामुळे पर्याय म्हणून अशा मोबाईल धारकांना हे ३३१० हँडसेट वापरता येणार आहे. या हँडसेटची किंमत ४ हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे असेही सांगण्यात आले.