करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशामध्ये थैमान घातलं आहे. दिवसोंदिवस देशामधील करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवसाला तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. करोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने देशातील अनेक भागांमध्ये आरोग्य विषय सेवांचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधांच्या तुटवड्याबरोबरच लसींचा तुटवडाही अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून लोक एकमेकांना शक्य ती मदत करत आहे. कोणी ऑक्सिजनचा पुरवठा करतय तर कोणी औषधांसाठी मदत करत असल्याचं चित्र ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर दिसून येत आहे. याच मदतीसंदर्भातील उल्लेख करत प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने बाबा रामदेव यांच्या पतांजलीला खोचक टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> चार महिन्यात २४१ कोटींची कमाई; ‘कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

चेतन भगत यांनी, “हे जरा हस्यास्पद आहे पण खूप तातडीने कोरोनिल हवीय असं एकही ट्विट पाहण्यात आलेले नाही,” असं ट्विट केलं आहे. कोरोनिल ही पतांजलीने तयार केलेलं औषध असून सुरुवातीला हे औषध करोनावर परिणामकारक ठरेल असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असल्याची सारवासारव करण्यात आली होती. मात्र करोना कालावधीमध्ये बाजारात आलेल्या करोनीलने पतांजलीला कोट्यावधीची कमाई करुन दिल्याच्या बातम्याही नंतर समोर आल्या होत्या. याच कोरोनिलवरुन चेतन यांनी बाबा रामदेव आणि पतांजलीला खोचक टोला लगावला आहे.

मात्र चेतनच्या या ट्विटनंतर कमेंटमध्ये अनेकांनी त्याला ट्रोल केल्याचं दिसत आहे. पाहुयात त्याच्या ट्विटवरील काही कमेेंट…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

काही दिवसांपूर्वीच देशातील करोना लसीच्या तुडवड्यावरून चेतनने सरकरावर निशाणा साधला होता. चेतनने भारतात फायझर आणि मॉर्डना सारख्या उत्तम लसींची आयात का केली जात नाही ? असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. चेतनच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली होती.