News Flash

#GlobalFekuDay टॉप ट्रेण्ड : मोदी रोजच खोटं बोलत असल्याने एप्रिल फूल्स डेची गरज काय?, नेटकऱ्यांचा प्रश्न

अनेकांनी मिम्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांचा समाचार घेतलाय

फोटो सौजन्य: ट्विटरवरुन साभार

आज आहे एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्स डे. या दिवशी सहसा लोक एकमेकांशी वागताना जरा सांभाळूनच वागतात. कारण, या दिवशी कोण, कोणाला, कधी आणि कशी टोपी घालेल अर्थात वेड्यात काढेल याचा काहीच नेम नसतो. जगभरामध्ये एकमेकांना फसवण्याचा दिवस म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या दिवसानिमित्त भारतीय नेटकऱ्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. आज ट्विटरवर #GlobalFekuDay हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या चुकीच्या संदर्भांचा पाढाच विरोधकांनी आजच्या एप्रिल फूल्स डे निमित्त वाचला आहे. एक एप्रिल सुरु झाल्यानंतर अवघ्या आठ तासांमध्ये #GlobalFekuDay या हॅशटॅगवर २३ हजारहून अधिक जणांनी ट्विट केलं आहे. हा हॅशटॅग वापरुन करण्यात आलेले काही मोजके ट्विट पाहुयात…

१) अजूनही वाट बघतोय

२)आपण बदललो आहोत म्हणे

३) हा ग्लोबल फेकू डे

४) टू ए बीचं लॉजिक

५) मिम्सच्या माध्यमातून टोला

६) ३६५ दिवस खोटं बोलतात ते मग एप्रिल फूल्स डेची गरज काय?

७) गॅस थेअरी

८) मीच नारळात पाणी टाकलं

९) कशी वाटली गंमत

१०) संशोधन

११) बाय रोड जाऊयात

१२) असत्याचे प्रयोग

१३) किंमत नाही वाढली

१४) ६०० कोटी मतदार

१५) काय काय बोललेत ते पाहा

एप्रिल फूल्स डेला पंतप्रधान मोदींना अशाप्रकारे ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील काही वर्षांपासून एक एप्रिलला फेकू या शब्दाचा वापर करुन अनेक ट्रेण्ड व्हायरल केले जात असल्याचं चित्र दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2021 8:46 am

Web Title: global feku day trends on twitter of april fools day people troll pm modi scsg 91
Next Stories
1 “आज मैं ऊपर…”, मनिषा कोईरालाच्या गाण्यावर मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्विट
2 “हे पाहिल्यावर मी तरी कधीच मास्क विसरणार नाही”; आनंद महिंद्रांनी शेअर केला मरीन ड्राइव्हवरील ‘तो’ व्हिडीओ
3 Suez Canal Ship Video: सुएझ कालव्यातून निघताना त्या जहाजाने वाजवला ‘धूम’चा हॉर्न? Video बघून नेटकरी हैराण
Just Now!
X