भारताचे ‘चांद्रयान २’चे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान अवकाशात झेपावल्यानंतर अनेकांनी ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. अगदी नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनीच भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ट्विट करुन आनंद व्यक्त केला. नेटकऱ्यांनाही या चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर आनंद व्यक्त केला. मात्र त्यांनी याचवेळी खर्च खर्चिक मोहिमा करणाऱ्या नासालाही ट्रोल केले आहे.

अवघ्या ९७८ कोटींमध्ये भारताने ‘चांद्रयान २’ मोहिम यशस्वीपणे सत्यात उतरवली आहे. नासाच्या चंद्र मोहिमेपेक्षा हा खर्च अनेक पटींने कमी आहे. ‘चांद्रयान २’ मोहिमेचा खर्च कोणत्याही बड्या हॉलिवूड सिनेमापेक्षाही कमी आहे. त्यामुळेच खर्चिक मोहिमा करणाऱ्या नासाच्या शास्त्रज्ञांना या मोहिमेमुळे आश्चर्याचा धक्का बसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. नासाहून अनेक पटींनी कमी खर्च करत चंद्रावर यान पाठवणाऱ्या इस्रोचे अभिनंदन करतानाच अनेकांनी नासालाही चिमटा काढला आहे. पाहुयात व्हायरल मिम्स…

खर्च पाहून नासा

एवढ्या कमी खर्चाचं मिशन पाहून रडूच आलं

जाऊन बघा रेकॉर्ड

आता पैसेच उरले नाहीत

एवढ्या स्वस्तात कसं

भारताने केलेलं प्रक्षेपण पाहताना नासाचे वैज्ञानिक

कोण थांबवणार

आम्ही नोकऱ्या सोडायच्या का

वीस रुपये द्या मग सांगतो

दरम्यान, ‘चांद्रयान-२’ मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे.