भारतीय चित्रपट निर्माती गुनित मोंगा यांच्या ‘पिरियड. एंड ऑफ सेंटेंस’ ला ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी विभागात ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. मुंबई पोलीस यांनी यावरून एक कलात्मक ट्विट केले आहे.

मुंबई पोलिसच्या ट्विटरवर ऑस्कर विजेत्या पिरियड शॉर्ट फिल्मचा फोटो फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत भन्नाट असे कॅप्शन देण्यात आले आहे. जर शहरांना ऑस्कर दिले असते तर मुंबईनं नक्कीच अनेक पारितोषिकं जिंकली असती, असे ट्विट मुंबई पोलीसकडून करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. मुंबई पोलिस सुरक्षेच्या बाबतीत आघाडीवर आहे. मुंबई पोलिस आहे म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

‘पिरियड. एंड ऑफ सेंटेंस’ हा माहितीपट दिल्लीतील हपूर गावावर आधारित आहे. या गावामध्ये देखील मासिकपाळीबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मासिकपाळीच्या दरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना समोर जावं लागतं. या गावात सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशिन बसवलं जातं. पैसे जमाकरून हे मशिन्स बसवलं जातं त्यानंतर महिला पॅड्स तयार करायला शिकतात, आरोग्याविषयी जागृती निर्माण होते साधरण अशा स्वरुपाचा प्रवास या माहितीपटात आहे.