News Flash

‘हवाई चप्पल’बाबत कमेंट करणाऱ्या युजरला स्मृती इराणींचं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…

इराणी यांनी गार्डनमध्ये लॅपटॉपवर काम करतानाचा स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी किंवा अनेकदा आपल्या फॉलोअर्सनी विचारलेल्या वायफळ प्रश्नांना दिलेल्या जबरदस्त उत्तरामुळे त्या ट्रेंड होत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एका नेटकऱ्याला दिलेलं मजेशीर उत्तर व्हायरल होत आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या गार्डनमध्ये लॅपटॉपवर काम करतानाचा स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #PandemicMorning असं म्हटलं. इराणी यांनी नीळ्या रंगाच्या ड्रेससोबत पायात हवाई चप्पल घातल्याचं फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं.

इराणींच्या या फोटोवर एका युजरने ‘हवाई चप्पल’ अशी कमेंट केली. त्यावर स्मृती इराणी यांनी “अरे भाई…२०० रुपयांची हवाई चप्पल आहे…आता ब्रँड विचारु नकोस…लोकल आहे”, असं मजेशीर उत्तर दिलं. त्यांचं हे उत्तर म्हणजे ‘व्होकल फॉर लोकल’चं समर्थन असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)


स्मृती इराणी यांचं हे उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 2:03 pm

Web Title: internet user points at smriti iranis hawai chappal from home photo she jokes dont ask me the brand its local sas 89
Next Stories
1 आई-वडिलांनाही ओळखता येईनात जुळी; अजब उपाय शोधला अन् झाले ट्रोल
2 Video: फक्त 10 सेकंदांमध्ये जमीनदोस्त झाली 144 मजली इमारत, नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
3 ‘मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी पाहिजे, नाहीतर बायको…’, रजेसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज
Just Now!
X