06 March 2021

News Flash

आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला महाराष्ट्रातील तरुणाचा जीव, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नैराश्येपोटी FBवर लाइव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या तयारीत होता तरुण, पण तेवढ्यात...

फेसबुकवर लाइव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील धुळ्याच्या तरुणाचा आयर्लंड येथील फेसबुकच्या अधिकाऱ्यांमुळे जीव वाचलाय. युवक लाइव्ह आत्महत्या करण्याच्या तयारीत असतानाच फेसबुकच्या आयर्लंडयेथील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आणि अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकाला वाचवण्यात आलं.

नैराश्येपोटी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील तरुणाचा जीव आयर्लंडमधील फेसबुकचे सतर्क अधिकारी आणि मुंबई सायबर पोलिसांनी वाचवला. रविवारी रात्री आठच्या सुमारास फेसबुकने दिलेल्या त्रोटक महितीआधारे सायबर पोलिसांनी १० मिनिटात या तरुणाचे नाव, नेमका पत्ता आदी तपशील मिळवत धुळे पोलिसांना सतर्क केले. सायबर पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर पोचलेल्या धुळे पोलिसांना जखमी अवस्थेत हा तरुण सापडला.

ज्ञानेश पाटील (२३) असे या तरुणाचे नाव असून रविवारी रात्री त्याने धुळे येथील निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुकद्वारे सर्वदूर पसरेल(फेसबुक लाईव्ह) अशी व्यवस्था केली. ही चित्रफीत फेसबुकच्या आर्यलड येथील अधिकाऱ्यांनी पाहून पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना कळवले. ज्ञानेशचे फेसबुक खात्याला जोडलेले तीन मोबाइल क्रमांकही दिले. नंतर सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी दोन पथके तयार करत या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. पथकातील सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणांचे नाव आणि नेमका पत्ता शोधला. हे तपशील करंदीकर यांनी धुळे येथील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिले. पुढल्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेशचे घर गाठले आणि त्याचा जीव वाचवला.

दरम्यान, मुंबई सायबर पोलिसांनी नेमकी माहिती दिल्याने जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य झाले. अन्यथा तरुणाचा जीव वाचविणे अशक्य झाले असते, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.

पाचवी यशस्वी कारवाई :-
मुंबई सायबर पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत ज्ञानेशप्रमाणे अन्य चार तरुणांचा जीव वाचवला. यात टाळेबंदीत नोकरी सुटल्याने निराश झालेला दिल्लीतील आचारी(शेफ), पालकांशी भांडण करून मुंबईत आलेली कोलकात्याची महिला, इन्स्टाग्राम आधारे सर्वदूर पसरलेल्या आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे टोकाचे पाऊल उचलण्याच्या बेतात असलेली विद्यार्थिनी यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 11:53 am

Web Title: ireland mumbai dhule efforts saves maharashtra youth who live streamed suicide attempt on facebook sas 89
Next Stories
1 पाकिस्तान : वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ व्यक्तीला झाली अटक; कारण वाचून गोंधळून जाल
2 उत्तर प्रदेश : दोन वर्षापूर्वी चोरीला गेलेली Wagon R पोलीस अधिकाऱ्याकडेच सापडली; एका कॉलमुळे झाला भांडाफोड
3 Video : फलंदाजाने मारलेला षटकार थेट चाहत्याच्या बियर ग्लासमध्ये पडला अन्…
Just Now!
X