मासळी बाजारात आतापर्यंत एका माश्यावर लाखो किंवा हजारोंच्या बोली लागलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. पण जपानच्या मासळी बाजारात एका ट्यूना माश्यावर चक्क ४ कोटी ३३ हजारांची बोली लावली गेली. नववर्षातला माशांचा पहिला लिलाव सुकिजी मासळी बाजारात पार पडला. दरवर्षी नववर्षाच्या पहिला आठवड्यात ट्यूनाचा लिलाव करण्याची प्रथा टोकियोच्या या बाजारात आहे.

VIDEO : प्राण्यांची बर्फात मज्जाच मज्जा!

नववर्षाच्या पहिल्या आठड्यात ट्यूना लिलावाचा हा प्रकार जपानमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. येथे ट्यूना माशावर बोली लावणा-या अनेक कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायाला मिळते. या मासळी बाजारात ट्यूनावर बोली लावण्याची प्रथा फार पूर्वी पासूनच आहे. यंदा किओमुरा कंपनीने या माशावर सर्वधिक बोली लावली. २५० किलो वजनाच्या ब्लू फिन ट्यूनावर त्यांनी ४ कोटी ३३ हजारांची बोली लावली होती. २०१३ मध्ये झालेल्या लिलावात याच कंपनीने ब्लू फिन ट्यूनावर सुमारे १२ कोटींची बोली लावली होती. ब्लू फिन ट्यूना हा जपानी लोकांचा सगळ्यात आवडता मासा आहे. जपानमध्ये हा मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण असे असले तरी विलुप्त होत चाललेल्या प्रजातीमध्ये या प्रजातीचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात शिकारीमुळे या माशांची संख्या जवळपास ९७ टक्क्यांनी घटली आहे. असे असले तरी ट्यूनाची मागणी लक्षात घेऊन जपानमध्ये आजही तिची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.